Category Archives: Uncategorized

इतिहास

नावाविषयी माहिती
मूळ गांव हे : केणारी” यांचे होते.  त्यावेळी गावाचे नांव मोढे होते.  त्यानंतर गावाचे नांव मोढवे झाले.  सन १७७८ मध्ये सवाई माधवराव पेषवे यांनी या गावच्या पाटीलकीचे  निवाडापत्र तयार केले आहे.  त्यावरुन सन १७७८ पूर्वी या गावची पाटीलकी श्री. राजपुरे यांच्याकडे होती.  १७७८ च्या निवाडापत्रानंतर या गावची पाटीलकी श्री. थोटे मोरे पाटील  यांच्याकडे गेली.  थोटे मोरे पाटील हे ढवापूरीतून (मालषिरस तालूका) मुरठीच्या रानात बीरोबाच्या सोंडेषेजारी वाडा घालून रहिले तेथून नवीन जागा पाहून अलीकडे आले व तेथून गावाचे नांव मौजे मोढवे पडले.   लोकरस उर्फ वाघ उर्फ पुरंदरे हे या घराण्यातले इ. सन १७०० पर्यंत पुरंदर किल्याचे सुभेदार असल्याचे दिसते हे घराणे मूळ सुप्याला स्थायिक झाले.  त्यानंतर त्याच्या दोन द्यााखा झाल्या त्यापैकी अंबाजी त्र्यंबक हे सुपे व तुको त्र्यंबक यांना मोढवे गाव इनाम मिळाले व त्यांनी वस्ती केली व वाडा बांधला.